Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला दरमहा मिळेल 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा टोल महसूल – नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi-Mumbai Expressway | केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री (Union Minister for Road Transport and National Highways) नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले की, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे (Delhi-Mumbai Expressway) सुरू झाल्यानंतर केंद्राला दरमहिना टोलमधून 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचे उत्पन्न होईल. हा बहुप्रतिक्षीत एक्स्प्रेसवे 2023मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, संसदेच्या संबंधीत स्थायी समितीने एनएचएआयवर असलेल्या 97,115 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. यास अनुसरून गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

टोल उत्पन्न 1.40 लाख कोटींवर जाईल
गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) ‘सोन्याची खाण’ म्हटले (Gadkari called the National Highways Authority of India (NHAI) a “gold mine”). गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच एक मोठा दौरा केला.

त्यांनी रविवारी येथे म्हटले की, पुढील पाच वर्षात एनएचएआयचे वार्षिक टोल उत्पन्न वाढून 1.40 लाख कोटी रुपयांवर जाईल. आता तो 40,000 कोटी रुपयांचा स्तरावर आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे (Delhi-Mumbai Expressway) राष्ट्रीय राजधानी क्षेत्राशिवाय चार राज्यांतून जाणार आहे.

ही जागतिक स्तरावरील यशकथा
गडकरी म्हणाले की, देशाची राष्ट्रीय महामार्ग संरचना जागतिक स्तरावरील यशकथा आहे. एकदा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे सुरू झाला आणि जनतेसाठी खुला की केंद्राला दर महिना 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा पथकर महसूल देईल.

चार राज्यातून जाणार एक्स्प्रेसवे
आठ लेनचा हा एक्स्प्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून जातो. यामुळे राष्ट्रीय राजधानीपासून देशाच्या आर्थिक राजधानीमधील प्रवासाचा सध्याचा कालावधी 24 तासावरून कमी होऊन निम्मा म्हणजे 12 तास होईल.

 

ही एक सोन्याची खाण

दरम्यान एनएचएआयवर खुप मोठा कर्जाचा भार आहे.
याबाबत गडकरी म्हणाले की, नोडल एजन्सीला ‘ट्रिपल ए’ रेटिंग मिळाले आणि त्यांच्या सर्व रस्ते योजना उत्पादक आहेत.
एनएचएआय कर्जाच्या जाळ्यात नाही. ही एक सोन्याची खाण आहे.

एनएचएआयवरील कर्ज 3,06,704 कोटी रुपयांवर
मार्चमध्ये विभागाकडून संबंधित वाहतूक,
पर्यटन आणि संस्कृतीवर संसदेच्या स्थायी समितीने एनएचएआयवर असलेल्या 97,115 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती.

काही दिवसापूर्वीच मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले होते की,
एनएचएआयचे एकुण कर्ज यावर्षीच्या अखेरपर्यंत वाढून 3,06,704 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
ते मार्च, 2017 च्या अखेरपर्यंत 74,742 कोटी रुपये होते.

Web Titel :- Delhi-Mumbai Expressway | delhi mumbai expressway to fetch rs 1 000 to 1 500 cr revenues every month says gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Charanjit Singh Channi | चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवीन मुख्यमंत्री, पहिल्यांदा राज्यात दलित नेत्याला संधी

Pune Police | पुणेकरांनो मनःपूर्वक आभार ! गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Indian Railway | बेरोजगार सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना, 50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण; ‘या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी