Delhi Murder Case | ‘ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना, लवकरात लवकर फाशी द्या’; रुपाली चाकणकरांची मागणी

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन- दिल्लीत झालेले खून प्रकरण (Delhi Murder Case) चांगले गाजत आहे. समाजातील सर्व स्तरांवरून या घटनेची टीका होत आहे. स्वतःच्या लिव्ह-इन पार्टनर, श्रद्धा वालकरची 18 मे रोजी निर्घृणपणे हत्या 28 वर्षीय आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने केली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून तिची हत्या (Delhi Murder Case) केली होती. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. (Rupali Chakankar On Delhi Murder Case)

आता, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाकडून (Maharashtra State Women’s Right Commission) होत आहे. तसेच नराधम आफताब लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali ChakanKar) यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे (National Women’s Right Commission) पाठवले आहे.

महाराष्ट्रातील वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या तरुणीची दिल्लीत झालेली
निघृण हत्या (Delhi Murder Case) आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना, ही माणुसकीला काळीमा
घटना आहे. बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी लगेच कारवाई केल्याने या
५ महिन्यापुर्वी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लागला. मात्र, आता आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे आणि सशक्त
दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याचे मोठे आव्हान आहे. या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी.
या प्रकरणाचा तपास जलद होउन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय
महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापुढे ही राज्य महिला, आयोग याचा पाठपुरावा करेल.
अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

Web Title :-  Delhi Murder Case | hang that murderer as soon as possible demanded the maharashtra state commission for women rupali chakankar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे यांचा शिंदे गट आणि भाजपाला टोला; “बालहट्ट पूर्ण केला पाहिजे…”

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती