Delhi Murder Case | आफताबच्या वकिलाचा अजब दावा; ‘आफताबला कोणीतरी भडकवलं असू शकत’, चौकशीची मागणी

दिल्ली: वृत्तसंस्था – दिल्लीत झालेले खून प्रकरणाची (Delhi Murder Case) समाजातील सर्व स्तरांवरून टीका होत आहे. स्वतःच्या लिव्ह-इन पार्टनर, श्रद्धा वालकरची 18 मे रोजी निर्घृणपणे हत्या 28 वर्षीय आफताब पूनावाला याने केली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून तिची हत्या (Delhi Murder Case) केली होती. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते मोठ्या फ्रिज मध्ये ठेऊन हळूहळू त्याची विल्हेवाट लावली.

 

हे प्रकरण (Delhi Murder Case) उघडकीस आल्यानंतर आफताबला अटक करण्यात आली. नंतर, आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केले ते ‘हिट ऑफ द मोमेन्ट’ (Heat Of The Moment) मध्ये घडले, अशी कबुली त्याने न्यायाधीशांसमोर दिली आहे. त्यानंतर, आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे.

पण त्याच्या वकिलाने अजब दावा केला आणि म्हणाले, ‘त्याने केलेले कृत्य हिट ऑफ द मोमेन्ट होती.
त्यामुळे त्याच्या हातून ही हत्या झाली, असं तो म्हणतोय. मात्र आफताबला कोणीतरी भडकवलं देखील असू शकत,
त्यामुळे त्याला भयंकर राग आला असेल आणि त्याच्या हातून ही हत्या झाली.
तसेच या घटनेत तिसरा व्यक्तीचाही समावेश असू शकतो. त्याची चौकशी झाली पाहिजे.’ असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title :- Delhi Murder Case | shraddha walker murder case aaftabs lawyers have claimed that someone may have provoked him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत