नीरव मोदी, मल्ल्या नंतर ‘हा’ मोठा बिल्डर होणार होता फरार ; पोलिसांनी विमानतळावरून केलं अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मोठे उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक मनप्रीत सिंह चड्ढा ऊर्फ माँटी यास अटक करण्यात यश मिळविले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माँटी चड्डा यास पोलिसांनी बुधवारी रात्री विमानतळावरून अटक केली. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या याच्यावर ग्राहकांची आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस(एलओसी) पण काढलेली आहे.
असे असताना तो गुरुवारी देशाच्या बाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु पोलिसांनी याअगोदरच त्याला पकडण्यात यश मिळविले असून उद्या त्याला न्यायालयासमोर आणले जाईल.

माँटी चड्डा दिवंगत लिकर किंग पॉंटी चड्डा याचा मुलगा असून पॉंटी चड्डा याची यापूर्वी हत्या झालेली आहे. माँटी रियल इस्टेट कंपनी हयटेक डेव्हलपर्स प्राइवेट लिमिटेड चा मालक असून या कंपनीवर फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

काय आहेत नेमके आरोप :

इओडब्ल्यू चे अतिरिक्त आयुक्त सुवाशीष चौधरी यांनी सांगितल्यानुसार माँटी आणि वेव ग्रुप च्या अन्य भागीदारांविरोधात २०१८ मध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता आणि काही महिन्यांपूर्वीच त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस(एलओसी) देखील काढलेली आहे. या सर्वांवर १०० कोटींपेक्षाही अधिक रकमेच्या फसवणुकीचे गुन्हे आहेत.

वेव ग्रुप ने राष्ट्रिय महामार्ग २४ च्या जवळ एक हायटेक टाउनशिप बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचा दावा ग्राहकांकडून पैसे घेताना केला होता, ज्यामध्ये मेट्रो ट्रेन आणि हॅलीपॅड सारख्या अत्याधुनिक सुविधा असतील. या गोष्टीला अनेक वर्षे उलटून गेले परंतु असा कोणताही प्रकल्प झाला नाही. यानंतर ग्राहकांनी पोलीसांमध्ये तक्रारी केल्या होत्या.

सिनेजगत

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

#MeToo : नाना पाटेकरांना ‘क्‍लीन चीट’ दिल्याने भडकली तनुश्री, केलं मुंबई पोलिसांबद्दल केले ‘गंभीर’ वक्‍तव्य