‘आप’ बहुमतापासून दूर राहिल्यास समर्थन देणार का ? काँग्रेसच्या ‘या’ दिग्गजानं दिलं ‘उत्तर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल 11 फेब्रुवारीला येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या पूर्ण बहुमताचे सरकार तयार होताना दिसत आहे. दरम्यान, जर आप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिले तर कॉंग्रेस पुन्हा सरकार स्थापनेसाठी त्याचे समर्थन करेल का ? या प्रश्नावर दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको यांनी उडवा – उडवीची उत्तर दिली.

चाको म्हणाले की, ‘हे निकालांवर अवलंबून आहे. एकदा निकाल लागला की, मगच आपण त्याविषयी चर्चा करू.” काँग्रेसच्या चांगल्या निकालांचा दावा करताना ते म्हणाले की, मला वाटते की ही सर्वेक्षण योग्य नाही. एक्झिट पोलमध्ये व्यक्त झालेल्या अंदाजापेक्षा काँग्रेसचा आकडा चांगला असेल.

दरम्यान, शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य निश्चित झाले. मतदानानंतर आलेल्या बहुतेक एक्झिट पोलच्या मते, पुन्हा एकदा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला 70 पैकी 50 जागा मिळताना दिसत आहे. दिल्लीत भाजपने जोरदार प्रचार केला, परंतु असे असूनही त्यांना केवळ 14 जागा मिळतील असे दिसते. त्याचवेळी काँग्रेसला फारच कमी जागा मिळू शकतील असे सांगण्यात आले आहे.

दिल्लीत एकूण 13,757 मतदान केंद्रे बांधली गेली
दिल्लीतील सर्व 70 जागांवर मतदान करण्यासाठी 2689 ठिकाणी एकूण 13,757 मतदान केंद्रे उभारली गेली. या निवडणुकीत 90 हजार कर्मचार्‍यांची ड्यूटी लागू करण्यात आली होती. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली होती. दिल्लीत सुमारे 40,000 सुरक्षा कर्मचारी, 19,000 होमगार्ड गार्ड आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 190 कंपन्या (सीएपीएफ) तैनात करण्यात आल्या आहेत.