ED चा मोठा खुलासा ! AAP चे नेते संजय सिंह आणि उदित राज यांचं PFI शी ‘कनेक्शन’, गृहमंत्रालयात दिला ‘रिपोर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) बद्दल अंमलबजावणी संचालनालयाने मोठा खुलासा केला आहे. गुरुवारी, ईडीने पीएफआय आणि शाहीन बागमध्ये नागरिकता सुधारित कायद्याच्या (सीएए) विरोधात फंडिंग देण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाला (एमएचए) एक अहवाल सादर केला. ईडीच्या अहवालानुसार आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांचादेखील पीएफआयशी संबंध आहे. तसेच संजय सिंह पीएफआय अध्यक्ष मोहम्मद परवेझ अहमद यांच्याशी सतत संपर्कात होते. ईडीने म्हटले आहे की संजय सिंग आणि परवेझ यांच्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटदेखील झाले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अहवालात असे म्हटले आहे की भीम आर्मी आणि कॉंग्रेसचे नेते उदिज राज यांचे पीएफआयशी संबंध होते. ईडी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ज्यांची नावे पुढे आली आहेत त्यांना योग्य वेळी नोटीस पाठविली जाईल आणि यासंदर्भात उत्तर पाठविण्यात येईल.

या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, पीएफआयची लिंक आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसशी कशी जोडली गेली आहे आणि त्यासाठी निधी कसा दिला जात आहे, यामागील सत्याचा उलगडा झाला आहे. नित्यानंद राय यांनी पुन्हा सांगितले की, शाहीन बाग निषेधमागे आम आदमी पार्टी आहे.

यूपी सरकारकडून पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी :
यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यूपी सरकारनेही केंद्रीय गृह मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिले होते. यूपी सरकारने म्हटले की, सीएए विरोधात राज्यात होणाऱ्या हिंसक निदर्शनामागील या संघटनेचा हात आहे. राज्याचे तत्कालीन डीजीपी ओपी सिंह यांनीही सांगितले की, पीएफआयच्या 25 सदस्यांना राज्यातील अनेक भागात दंगा आणि तोडफोड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.