जीवघेणे बनले धुके ! ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे वर धडकली 25 वाहने, एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली एनसीआरमध्ये आजची पहात धुक्यात बुडाली. यामुळे, गाझियाबादमधील ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर 25 वाहने एकमेकांना धडकली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक लहान आणि मोठी वाहने या दुर्घटनेत सामील आहेत. ग्रेटर नोएडाच्या कासना पोलिस स्टेशन भागात ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जाम हटविला.

आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके पाहायला मिळाले. यामुळे, ईस्टर्न पेरिफेरल हायवेवर अनेक छोटी-मोठी वाहने एकमेकांना धडकली. या अपघातामुळे हायवेवर गाड्यांची लांबलचक रंग लागली . क्रेनच्या मदतीने ही वाहने काढली जात आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून बरेच लोक जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धुक्याच्या वेळी पोलिसांनी वाहने अत्यंत सावधगिरीने चालवण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी म्हटले की, शक्य असल्यास या वेळी प्रवास करणे टाळा, परंतु जर तुम्हाला बाहेर जाणे गरजेचे असल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूने जावा, डिपरचा वापर करा आणि हळू प्रवास करा. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये येत्या काही दिवस धुके कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.