राजधानी दिल्लीत उष्णतेचा ‘कहर’, इतिहासातील सर्वात ‘हॉट’ दिवसाची नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज ( ता. १०) देशाची राजधानी नवी दिल्ली येथे उष्णतेने उच्चांक गाठला असून इतिहासात पहिल्यांदाच तापमान ४८ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. दिल्लीतील पालम या ठिकाणी तापमानाचा हा उच्चांक नोंदविला गेला. यामुळे हवामान विभागाने इशारा देत ‘रेड अलर्ट’ देखील दिला आहे. याआधी रविवारी राजधानीतील तापमान वाढू लागल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता आणि सोमवारी देखील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल असा अंदाज वर्तविला होता. रविवारी पालम येथील उच्चतम तापमान ४७.८ इतके होते.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २ दिवसांमध्ये देखील तापमान कमी होण्याची काहीही शक्यता नाही. दिल्लीशिवाय अन्य उत्तर भारतीय राज्यांमध्ये देखील तापमान ४५ डिग्री च्या आसपास राहील. मध्य प्रदेश, हरियाणा, चंदगड याठिकाणी देखील तापमानाची परिस्थिती अशीच राहील. बुधवार आणि गुरुवार साठी देखील तापमान ४३ डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ दिला आहे. शुक्रवार आणि शनिवारीदेखील तापमान ४३ च्या आसपासच राहणार असून या दिवसांसाठी मात्र कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही. अशा वातावरणामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा आणि दमटपणाचा सामना करावा लागत आहे. केवळ नागरिकच नाही तर प्राण्यांनासुद्धा या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहेत.

राजस्थानच्या गंगानगर क्षेत्रात देखील तापमान ४८.५ इतके होते. अंदाजानुसार उत्तर पूर्व भारतात मंगळवारपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनमुळे याठिकाणी हवामान चांगले आणि स्थिर होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

 

You might also like