निर्भया प्रकरणी आरोपींची फाशी ‘रद्द’ होणार ?, दया याचिकेच्या सुनावणीकडं देशाचं ‘लक्ष’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भया बलात्कार केसमधील दोषी अक्षयकुमार सिंह यांच्या पूर्नविचार याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शासनाकडून १६ डिसेंबरला त्यांना फाशी देण्याची तयारी केली जात होती. ती आता टळली आहे.

पाटियाला कोर्टात या केसमधील चार दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर करण्यात आले. या केसशी संबंधित एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही. त्यानंतर पाटियाला कोर्टात १८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दोषी अक्षयकुमार सिंह याच्या पुनर्विचार याचिकेची १७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यात अक्षयकुमारे याने दिल्लीतील प्रदुषणाचा हवाला देत फाशीची शिक्षा देण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान, या केसमधील निर्भया हिच्यावर १६ डिसेंबरला अत्याचार करण्यात आला होता. त्यामुळे १६ डिसेंबरलाच त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी होऊ लागली होती. निर्भयाच्या आईनेही कोर्टाने फाशीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर १७ डिसेंबरला सुनावणी ठेवली असल्याने त्यानंतरच फाशीचा निर्णय होऊ शकणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/