निर्भया केस : उद्या होणार फाशी ! आत नेमकं काय होतं, जाणून घ्या ‘जल्लाद’ कडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या दोषींची शेवटची वेळ जवळ आली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या चौघांनाही २० मार्च रोजी फाशी देण्यात येईल. हे काम करण्यासाठी पवन जल्लाद आधीच मेरठहून दिल्लीला पोहोचला आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने निर्भया दोषी मुकेशची याचिका फेटाळली आहे. निर्भयाच्या दोषी मुकेशने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

पवन जल्लाद याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, फाशीघरात फाशी देण्याआधी इशाऱ्याने काय बोलले जाते आणि त्यानंतर कसे फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवले जाते. पवन म्हणतो की फाशीची तारीख निश्चित होताच आम्हाला तुरूंगात बोलावण्यात येते. फाशी देण्यापूर्वी कैद्याचे पाय कसे बांधायचे, दोर कसा बांधायचा हे सर्व नियोजित केले जाते.

फाशी देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात पवन जल्लादने सांगितले की वेळ निश्चित होण्याच्या १५ मिनिटांपूर्वी ते फाशीघरात जातात. आम्ही तोपर्यंत तयार असतो. फाशीची तयारी करण्यासाठी एक ते दीड तास लागतात. बॅरॅकमधून कैदी फाशी घरात येण्याच्या प्रक्रियेवर पवन म्हणाला होता, की फाशी घरात आणण्यापूर्वी कैद्याच्या हातात हातकड्या लावल्या जातात, नाहीतर हातांना मागे करून दोरीने बांधतात. दोन शिपाई त्यांना पकडून आणतात. बॅरॅकपासून फाशी घराच्या अंतरानुसार ते फाशी देण्याच्या वेळेआधीच त्यांना आणले जाते.

फाशीघराबद्दल बोलताना पवन म्हणतो की तेथे फाशी देताना ४-५ पोलीस शिपाई असतात, ते कैद्याला फाशीच्या ठिकाणी उभे करतात. ते काहीही बोलत नाहीत, फक्त इशाऱ्यांनीच सर्व काम होते. एक दिवस आधीच आमच्या सर्वांची जेल अधीक्षकांबरोबर बैठक घेतली जाते. या व्यतिरिक्त तुरुंग अधीक्षक, डेप्युटी जेलर आणि डॉक्टरही फाशी घरात हजर असतात.

तिथे उपस्थित लोक फाशी देताना काहीही बोलत नाहीत, केवळ हातवारे करून काम केले जाते. यामागचे कारण स्पष्ट करताना पवन म्हणतो की असे करण्याचे कारण कैद्याला त्रास होऊ नये अथवा त्याने कोणतेही नाटक करू नये. म्हणूनच प्रत्येकाला सर्व काही माहित असते, परंतु कोणीही काही बोलत नाही.

अशी दिली जाते फाशी :
फाशी देण्यास १० ते १५ मिनिटे लागतात. या संपूर्ण प्रक्रियेबाबत पवनकडून सांगण्यात आले की कैदीचे हात तर बांधलेलेच असतात, नंतर त्याचे पाय देखील बांधले जातात. डोक्यावर टोपी टाकली जाते आणि नंतर फाशीचा फंदा घट्ट केला जातो. पायांना बांधण्याचे आणि डोक्यावर टोपी टाकण्याचे काम नेहमीच बाजूने केले जाते, कारण अशी भीती असते की कैदी मृत्यूच्या आधी फाशी देणाऱ्यास पायाच्या साहाय्याने इजा करेल. फाशीच्या फंद्याला घट्ट करण्यासाठी कैद्याच्या चारही बाजूने फिरावे लागते. सर्व कामे पूर्ण होताच आम्ही लिवर जवळ पोहोचतो आणि तुरूंग अधीक्षकांना अंगठा दाखवून सांगितले जाते की आमचे काम पूर्ण झाले आहे. आता इशारा मिळताच लिवर खेचण्याची तयारी चालू होते.

गोल वर्तुळ बनवले जाते : 
पवन म्हणाला की कैदीस उभे केले जाते त्या ठिकाणी गोल वर्तुळ केले जाते, ज्यात कैद्याचे पाय असतात. जेल अधीक्षक रुमालाने इशारा करतात तेव्हा आम्ही लिवर खेचतो आणि कैदी थेट खड्ड्यात टांगला जातो. १० ते १५ मिनिटांत त्याचे शरीर शांत होते. त्यानंतर डॉक्टर कैद्याच्या शरीराजवळ जाऊन त्याच्या हृदयाचे ठोके तपासतात. तोपर्यंत शरीर थंड झालेले असते.

फाशी नंतरची प्रक्रिया :
त्यानंतर डॉक्टर शिपायाला इशारा करतात, मग शिपाई कैद्याचा मृतदेह फंद्यापासून खाली उतरवतात आणि चादर शरीरावर टाकली जाते. फंदा आणि दोरी काढून आम्ही त्यास एका बाजूला ठेवतो, त्यांनतर आमचे काम संपते.