निर्भया केस : दोषींना जेलरने पुन्हा विचारली शेवटची ‘इच्छा’, उरलीय ‘लाइफ लाइन’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – फाशीवर चढवले जाणार म्हणून जेल प्रशासनाने चारही गुन्हेगारांना तुमची शेवटची इच्छा काय ? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर मात्र फाशीची तारिक पुढे ढकलण्यात आली त्यावेळी देखील जेल प्रशासनाने तुमची शेवटची इच्छा काय असा प्रश्न गुन्हेगारांना विचारला. मात्र असे वारंवार होत असल्याने कोणालाही राग येणे सहाजिक आहे. तसेच काहीसे निर्भया केसमधील गुन्हेगारांबाबत घडले आहे.

8 जानेवारी 2020, तिहार जेल नंबर-3
मुकेश, पवन, विनय आणि अक्षय या चारही गुन्हेगारांना 8 जानेवारी 2020 रोजी वेगवेगळ्या जेल मध्ये हलवण्यात आले कारण चारही गुन्हेगारांच्या नावे डेथ वॉरंट जारी करण्यात आले होते आणि त्यांना 22 जानेवारीला फाशी देणार यावर देखील शिक्कामोर्तब झाला होता त्यामुळे जेल प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कडे स्वतः जाऊन तुम्हाला कोना कोणाला भेटण्याची इच्छा आहे आणि कोणती अर्धवट कामे पूर्ण करायची आहे असे प्रश्न विचारात होते.

15 दिवसानंतर, 23 जानेवारी 2020
पंधरा दिवसांमध्येच जेल अधिकारी पुन्हा एकदा चारही गुन्हेगारांकडे गेले आणि त्यांना तुमची शेवटची इच्छा काय ? असा सवाल करू लागले. एखाद्या कैद्याला फाशी द्यायची असेल तर त्याला त्याची अर्धवट राहिलेली कामे करण्याचा अधिकार आहे मात्र ही कामे कायद्याच्या चौकटीतील असावी. म्हणून फाशी जाहीर झालेल्यांना हा प्रश्न विचारला जातो.

कायद्यातील गोंधळामुळे पुढे ढकलली तारिक
पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर एका आरोपीने क्यूरेटिव पिटिशन दाखल करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि दया याचना केली यानंतर मात्र न्यायालयाने त्यांची फाशी फेब्रुवारीमध्ये ढकलण्याचा निर्णय घेतला.

जेलरने पुन्हा विचारली कैद्यांना ‘शेवटची इच्छा’
जेल नियमानुसार आता जेलरला पुन्हा एकदा कैद्यांना त्याची अंतिम इच्छा विचारावी लागणार होती त्या प्रमाणे 23 जानेवारीला जेलरने पुन्हा चारही आरोपीना त्यांची शेवटची इच्छा विचारली. मात्र जेलरला पुन्हा एकदा गुन्हेगारांना त्यांची शेवटची इच्छा विचारावी लागणार आहे कारण फाशीच्या एक दिवस आधी पुन्हा एकदा यातील कोण ना कोण तरी न्यायालयात धाव नक्की घेईल.

फेसबुक पेज लाईक करा