भाजपला आणखी एक दणका बसणार ? ‘असा’ आहे केजरीवालांच्या दिल्लीचा ‘कौल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगानं आजच (सोमवार दि 6 जानेवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. 8 फेब्रुवारी रोजी या सर्वात छोट्या परंतु महत्त्वाच्या राज्यात निवडणूक होणार आहे. 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे त्यानंतर स्पष्ट होईल की मतदारांचा कौल कोणाच्या दिशेने आहे. नुकतीच सी व्होटरची जनमत चाचणी समोर आली आहे. या चाचणीनुसार, हे राज्यही भाजपच्या हातून जाणार असल्याचं चित्र दिसत आहे.

सीवोटरची चाचणी सांगत आहे की, या निवडणुकीतही अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने निकाल लागणार आहे. सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये आपला 59 जागा मिळतील तर भाजपला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला मात्र 3 जागांवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे. 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 67 जागा मिळवून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला होता.

मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीकरांचा कौल कोणाला ?

मुख्यमंत्रिपदासाठी लोकांचा कौल काय आहे हेही या चाचणीतून समोर आले आहे. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पसंती दिली आहे. यात 69.50 टक्के दिल्लीकरांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या नावाला(10.7 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर पसंती मिळाली आहे. इतकेच नाही तर मनीष सिसोदीया(2.2 टक्के) आणि भाजपचे विजय गोयल(1.1 टक्के) यांचंही नाव काही दिल्लीकरांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंत केलं आहे.

कोणत्या पक्षाला किती वोटशेअर ?

ओपिनियन पोलनुसार, आम आदमी पक्षाला 53 टक्के वोटशेअर मिळेल तर भाजपला 26 टक्के मतं मिळतील.

पंतप्रधानपदी दिल्लीकरांची पसंती PM मोदींनाच

दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून दिल्लीकरांची पसंती जरी केजरीवाल यांच्या नावाला असली तरी पंतप्रधान म्हणून दिल्लीकरांची पसंती नरेंद्र मोदींच्या नावालाच आहे असंही जनमत चाचणी सांगते. आम आदमी पक्षाने केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. भाजपचे स्टार कँपेनर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील असं चित्र दिसत आहे. भाजपने मात्र अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नाही. दरम्यान पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असायला हवेत असं 63.3 टक्के लोकांनी म्हटलं आहे तर पंतप्रधान बदलायला पाहिजे असं 34 टक्के दिल्लीकरांचं म्हणणं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/