खुशखबर ! इंधनाच्या दरात कमालीची ‘घसरण’, पेट्रोल 2.69 तर डिझेल 2.33 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा फायदा आता सर्वसामान्य भारतीयांना होऊ लागला आहे. भारतात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात झाली. बुधवारी पेट्रोलचे दर 2 रुपये 69 पैशांनी घसरून 70.20 रुपये प्रति लीटरवर आले. तर डिझेलचे दर 2.33 रुपयांनी घसरून 63.01 रुपयांवर आले. सौदी अरब आणि रशियामध्ये ऑईल प्राईस वॉर सुरू झाल्याने सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती अंतरराष्ट्रीय बाजारात 31 टक्क्यांनी कोसळल्या होत्या. यात भारताला आर्थिक लाभ होऊ शकतो, कारण आपला देश इंधनासाठी खुप मोठ्याप्रमाणात आयातीवर अवलंबून आहे.

भारताला लागणारे 84 टक्के तेल आयात केले जाते. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने देशाचा आयात खर्च कमी होणार आहे आणि किरकोळ किमतीही कमी होतील. परंतु, यापूर्वीपासून दबावाखाली असलेल्या ओएनजीसीसारख्या कंपनीची आवस्था आणखी खराब होऊ शकते.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातच्या अर्थव्यवस्थेला थोडा आधार मिळू शकतो. यामुळे अनेक क्षेत्रात कच्च्या मालाचा खर्च कमी होणार आहे. बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी जारी केलेल्या किंमतींनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत सोमवारी 70.20 रुपये प्रति लीटरवर पोहचली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत एक डॉलरच्या कपातीमुळे भारताचा आयात खर्च 2,936 करोड रुपये कमी होतो. याप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किमतीत एक रुपया प्रति डॉलरचा बदल आल्यास आयात खर्चात 2,729 करोड रूपयांचे अंतर पडते.