जामिया हिंसाचार ! 10 आरोपींना अटक, सर्वांचे गुन्हेगारी ‘रेकार्ड’ असल्याचा पोलिसांचा दावा, एकही विद्यार्थी नाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – १५ डिसेंबरच्या रात्री जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या गोंधळामुळे दिल्ली पोलिसांनी १० तरुणांना अटक केली आहे. सर्व तरुणांचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोणतेही विद्यार्थी नाहीत. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना क्लीन चिट दिली गेली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याच वेळी, निदर्शनाच्या वेळी पोलिसांनी बस जळण्याच्या प्रकरणातील आरोपी युवकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसंनी ज्या तरुणांना ताब्यात घेतले आहे , त्यांच्यावर रविवारी रात्री घडलेल्या हिंसाचारात समावेश असल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात चार सरकारी बसेसना आग लावण्यात आली. तसेच प्रवाशांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांना तेथून दूर नेले. तसेच पोलिसांनी विद्यापीठात घुसून अश्रुधाराही सोडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले :
सोमवारी जामिया येथे झालेल्या हिंसाचारासाठी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. पहिला गुन्हा न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये तर दुसरा गुन्हा जामिया नगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी जाळपोळ, दंगल, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नदवा आणि डीयूमध्येही निदर्शने करण्यात आली :
जामिया हिंसाचारानंतर नदवा कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातही निदर्शने करण्यात आली. नादवाच्या गेटवर दगडफेक करण्याची घटना घडली. त्याचवेळी दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवरही डीयूचा निषेध रोखण्यासाठी डीयूमध्ये प्रवेश केल्याचा आरोप होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/