दिल्लीमधील दहशतवादी हल्ला टळला, IED सोबत तीन संशयीत अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांना एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याला रोखण्यात मोठे यश आले आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी IED सोबत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुवाहाटी मधून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. तीनही संशयित आयएस शी संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके देखील जप्त केलेली आहेत.

दिल्ली पोलीस डीसीपी स्पेशल सेलचे प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, पोलिसांनी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (IED) सोबत तीन संशयितांना अटक केली आहे. पकडलेल्या संशयितांचा दिल्ली, आसाम सहित अनेक राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न होता.

जम्मू काश्मीरमधून देखील एकाला जिवंत ग्रेनेड सोबत अटक केली आहे. बारामुल्ला मध्ये हल्ला करण्याच्या विचारात हा अतिरेकी होता. सध्या पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

धमकी देण्याचे काम करत होता व्यक्ती
अवंतीपोरा येथे पोलिसांनी गुरुवारी दहशतवाद्याच्या एका सहयोगील अटक केली. पोलिसांनी सांगितले की पकडलेला व्यक्ती त्राल क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांना धमकी देण्याचे काम करत होता. तसेच आसिफ अहमद भट्ट हा आसपासच्या प्रदेशात धमकीचे पोस्टर लावण्यामध्ये सामील होता.

Visit : Policenama.com