धक्कादायक ! हेल्मेट काढायला सांगून तरुणीने प्रियकराबरोबर केले ‘हे’ काम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुणीने आपल्या प्रियकरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीच्या प्रियकराने  लग्नास नकार दिल्याने तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून त्याला जखमी केले आहे. दिल्लीमधील विकासपुरी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी तरुणी प्रियकरासोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. यावेळी तिने प्रियकराला आपण व्यवस्थित स्पर्श करत नसल्याचं कारण सांगत हेल्मेट काढायला सांगितलं. यानंतर काही वेळाने तरुणीने प्रियकरावर अ‍ॅसिडने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर झाला असून त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलीस चौकशी करत असताना तिने सांगितले कि, आम्ही दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना कुणीतरी आमच्यावर हल्ला केला, मात्र प्रेयसीने आपल्याला हेल्मेट काढायला सांगितले असल्याचे  प्रियकराने पोलिसांना सांगितले असता पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबुल केला.  याविषयी अधिक तिने सांगितले कि, आम्ही दोघे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात आहोत. पण काही दिवसांपूर्वी तरुणाने आपल्याला हे नातं संपवायचं असल्याचं सांगितलं होतं. प्रियकर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्यानेच तरुणीने त्याचा चेहरा खराब करायचा ठरवलं होतं.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तरुणीवर गुन्हा नोंदवला असून, तिची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आरोपी तरुणी हि बीएची विद्यार्थिनी आहे.