पोलिसांनी केला ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 तरुणींसह चौघांना घेतलं ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील एका ऑनलाइन सेक्स टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तर ही टोळी वेश्याव्यवसाय करण्यासाठी तरुणींना फाइव्ह स्टार हॉटेलात पाठवायचे. एका मुलीच्या अपहरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करून हे प्रकरण उघडकीस आणले. तर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून २ तरुणींसह ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.

अधिक माहितीनुसार, दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात या कारवाईला सुरुवात झाली. दिल्ली पोलिसांना २२ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीच्या अपहरणाची तक्रार मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा छडा लावण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारले. खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी परिसरात छापे मारले. तेथून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणाचा तपास केला असता, सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या अपहरणाचा संबंध ऑनलाइन सेक्स रॅकेटशी असल्याची माहिती तपासात समोर आली. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिचे अपहरण झाले होते. ती जवळच्या एका दुकानात खाऊ आणायला गेली होती. तिथे दोघे आले. त्यांनी वाढदिवसाचा केक कापायचे असल्याचे सांगून तिला घेऊन गेले. केक खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला घेऊन गेले. ऑनलाइन सेक्स रॅकेटची संबंधित टोळीतील इतर सदस्यांच्या सुपूर्द केले.

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संजय, अंशू, कनिका रॉय, सपना गोयल यांना ताब्यात घेतले आहे. तर संजय आणि कनिका हे दोघे दिल्लीतील रहिवासी आहेत. तर सपना आणि अंशू शर्मा हे उत्तर प्रदेशा राज्यातील आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. टोळीतील सदस्य तिला जबरदस्ती अंमली पदार्थ देत होते, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. याचा अधिक तपास दिल्ली पोलीस करीत आहेत.