Delhi Roits : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आणि प्रदर्शनामध्ये ISI ची भूमिका होती, पोलिसांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्ली दंगल आणि सीएए आणि एनसीआरविरोधात झालेल्या निदर्शनात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयची भूमिका समोर आली आहे. पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून खलिस्तान समर्थक सीएए आणि एनसीआरविरोधात निषेध स्थळांवर गेले होते.

आयएसआयने खलिस्तान समर्थकांना शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले होते. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल दिल्ली दंगल आणि निदर्शनांमध्ये आयएसआयच्या भूमिकेबद्दल तपास करत आहे. दिल्ली पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी अतर खानच्या वक्तव्याच्या रुपात ही बाब ठेवली आहे. याव्यतिरिक्त प्रदर्शनात महिलांना गोळा करण्यासाठी पैसे वाटले गेले होते.

स्पेशल सेलने आरोपी अतर खानची विधाने आरोपपत्रात ठेवली आहेत. अतार खानने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चांद बाग आणि शाहीनबागमध्ये खर्चासाठी पैशांची व्यवस्था सिद्दीकी उर्फ सलमान करत असे. डॉ. रिजवान सिद्दीकी शाहीनबाग येथील निदर्शनाच्या ठिकाणी येत-जात असे. डॉ. रिझवान सिद्दीकीने १० फेब्रुवारीला त्याला आणि इतरांना सांगितले होते की, निदर्शनाच्या ठिकाणी त्याची भेट खालिस्तान समर्थक बगीचा सिंह आणि लवप्रीत सिंह यांच्याशी झाली आहे.

या लोकांनी सांगितले होते की, ते भारताविरूद्ध काम करत आहेत. बगीचा सिंहने म्हटले होते की, त्याला आयएसआयचा पाठिंबा मिळाला आहे. आयएसआयने निरोप पाठवला आहे की, खलिस्तान समर्थकांनीही सीएए आणि एनसीआरच्या विरोधात भाग घ्यावा. बगीचा सिंह शाहीनबाग येथे आला होता. काही दिवसांनंतर सरदार जबरजंग सिंह चांदबाग येथील निषेधाच्या ठिकाणी गेला होता. जबरजंग सिंहने चांदबागे येथे भारत सरकारविरूद्ध खूपच भडकाऊ भाषण दिले होते.

डॉ. रिझवानने असेही सांगितले की, बगीचा सिंहनेही म्हटले होते की, तो प्रत्येक ठिकाणी आपल्या माणसाला पाठवेल. तसेच असेही म्हटले होते की, आयएसआयने सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीच्या तपासात आयएसआयची भूमिका उघडकीस येत असल्याचे स्पेशल सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आयएसआयच्या भूमिकेचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ही टीम आयएसआयच्या भूमिकेचा शोध घेत आहे.

निदर्शनाच्या ठिकाणी महिलांना पैसे वाटले गेले

उमर खालिद १५ डिसेंबर रोजी जामिया नगरला गेला होता. येथे त्याने जामिया समन्वय समिती स्थापन करण्यास सांगितले. जामियाच्या गेट क्रमांक सात जवळ समितीचे कार्यालय बनवले गेले. येथे दिल्लीतील दंगल आणि निदर्शन जागांसाठी गुप्त बैठकी व्हायच्या. येथे झालेल्या एका बैठकीत शिफा उर रहमान आणि अरीबने बैठकीत उपस्थित असलेल्या एका मुलीला पैसे दिले.

या मुलींनी हे पैसे निदर्शनाच्या ठिकाणी बसलेल्या महिलांना वाटायचे होते, जेणेकरुन महिला जास्तीत जास्त निदर्शनात येतील. दिल्ली पोलिसांनी समितीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराच्या विधानाच्या आधारे हे मुद्दे मांडले आहेत. एका साक्षीदाराने असेही म्हटले आहे की, महिलांना त्यांची रोजंदारी म्हणून पैसे दिले जात होते.

ताहीर हुसेनशी संबंधित प्रकरणात आरोपीचा जामीन फेटाळला

उत्तर पूर्व दिल्ली दंगल प्रकरणातील एका आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. हा आरोपी त्या गर्दीतही होता, ज्याने अजय नावाच्या तरूणाला गंभीर जखमी केले होते. उच्च न्यायालयाने साक्षीदारांची विधाने पाहता आरोपीची जामीन याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक ताहिर हुसेनही आरोपी आहे.

न्यायाधीश सुरेश कैत यांनी जामीन अर्ज फेटाळत म्हटले की, आरोपी तनवीर मलिकही अशा दोन इतर प्रकरणांमध्ये आरोपी आहे आणि त्याला दयालपूर पोलिस ठाण्यातील एका प्रकरणात ३० मे २०२० रोजी जामीन मिळाला होता. त्या आदेशाचा विचार केल्यानंतर या प्रकरणातील आरोपीची जामीन याचिका फेटाळली जाते.

दंगल आरोपी तनवीरने वकील हिमाल अख्तर यांच्यामार्फत याचिका दाखल करत दंगल, हत्या करण्याचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचण्यासंबंधी जामीन मिळण्याचे आवाहन केले होते.

जामीन अर्जाला विरोध दर्शवत विशेष वकील अमित प्रसाद म्हणाले की, पीडित अजयच्या निवेदनानुसार, २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास जेव्हा तो घरातून सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता, तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो चांदबाग येथील लखपत शाळेजवळ पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की संपूर्ण भागात दंगल पसरली होती.

विशेष वकील म्हणाले की, जेव्हा अजय ताहिर हुसेनच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले कि दंगेखोर त्याच्या घराच्या छतावर होते. तेथून हे लोक दगडफेक व गोळीबारासह पेट्रोल बॉम्बही फेकत होते. हे लोक धार्मिक घोषणाही देत होते. काही मुलांनी ते पाहिल्यानंतर त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली आणि एका मुलाने त्याच्या उजव्या खांद्यावर पिस्तूल सारख्या शस्त्राने गोळी झाडली.

न्यायालयाने अजयच्या २ मार्च २०२० रोजीच्या निवेदनावरून सहमती दर्शवत म्हटले की, ताहिर हुसेनच्या घराच्या छतावरून दंगेखोर धार्मिक घोषणा देत होते. त्याने गोळी झाडणारा मुलगा गुलफाम आणि इतर अनेक मुलांनाही ओळखले होते.