Coronavirus : ‘कोरोना’मुळं दिल्ली पोलिस दलातील पहिला बळी, 32 वर्षीय कर्मचार्‍याचा मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दिल्ली पोलिसांत कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. भारत नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात हवालदाराचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. हवालदाराच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी घेण्यात आली, ज्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.

एका 32 वर्षीय हवालदार अमितची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडली. सोमवारी रात्री त्यांनी तापाची तक्रार केली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना औषध दिलं आणि कोरोनाची तपासणीही झाली. मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. प्रकृती अधिकच खराब झाली, त्यानंतर त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अमितचा रुग्णालयात मृत्यू झाला.

सुरुवातीला, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, परंतु अचानक त्यांची तब्येत ढासळली. पोलिसांचे म्हणणे आहे की अमितचे नमुने घेण्यात आले होते, ज्यांचा अहवाल आता सकारात्मक आला आहे. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांचे 70 हून अधिक कर्मचारी कोरोना विषाणूचा बळी ठरले आहेत. आतापर्यंत उघड झालेल्या माहितीनुसार 9 पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत. दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र बनविण्यात आले आहेत.

दिल्लीत 5,104 लोकांना कोरोनाचा संसर्ग

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,104 झाली आहे. मंगळवारी एकूण 206 नवीन प्रकरणे उघडकीस आली. दिल्लीतील कोरोनामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1,468 आहे. संसर्गामुळे आजार बळावल्यानंतर 17 रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दिल्लीत 11 दिवसांच्या अंतराने कोविड -19 संसर्गाची दुपटीने प्रकरणे समोर येत आहेत.