नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हजारो नागरिकांची फसवणूक करणा-या दिल्लीतील पिरागढी येथील एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात 42 जणांना अटक केली असून त्यात 16 महिलांचा समावेश आहे. तसेच कॉल सेंटरमधून 90 उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत.
सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरागढी येथे एक बोगस कॉंल सेंटर सुुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, त्याठिकाणी 40 हून अधिक लोक आढळून आले. त्यात 16 महिला देखील होत्या. हे सर्व आरोपी लॉ अँड एन्फोर्समेंट एजन्सी असल्याची बतावणी करून परदेशी नागरिकांना लक्ष्य करत असत. आरोपींनी आतापर्यंत 3, 500 जणांना गंडा घातला आहे. त्यांची जवळपास 70 कोटींची फसवणूक केली आहे. हे सर्व आरोपी बऱ्याच काळापासून अशा प्रकारचे काम करत असावेत, असे त्यांच्याकडे सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरून लक्षात येते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे.