अलर्ट ! ‘या’ नंबरहून SMS आल्यास दुर्लक्ष करा, बँकेतील अकाऊंट होईल रिकामं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सतत होणाऱ्या अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे. याला चाप लावण्यासाठी सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने काही क्रमांक शेअर करत सर्वांना दक्षतेचा इशारा दिलाय. या क्रमांकावरून आलेल्या SMS मधून फसवणूक करायचा अधिक धोका आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमने दिला आहे.

अधिक माहितीनुसार, तुम्हाला देखील हा फसवणुकीता मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचे सिम काही KYC मधील समस्येमुळे ब्लॉक केले असून संबंधित क्रमांकावर फोन करा अशी सूचना दिली असेल. मात्र, या क्रमांकावर कधीही फोन करु नका. या मेसेजमध्ये सांगितलेले कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड देखील करु नका. तसेच, कोणतेही पेमेंट करु नका. अशी माहिती दिल्लीच्या डीसीपी सायबर क्राइमने ट्विट करत दिले आहे.

या दरम्यान, KYC मध्ये आलेल्या काही अडचणींमुळे तुमचा क्रमांक ब्लॉक होऊ शकतो अशी सूचना देणारा मेसेज या नंबरहून येतो. ही अडचण दूर करण्यासाठी काही नंबरवर फोन करण्याची सूचना या मेसेजमध्ये दिलेली आहे. जी मंडळी या मेसेजला फसतात, त्यांची फसवणूक होत आहे. दरम्यान, सायबर क्रिमिनल ग्राहकांना VIP नंबरसाठी पेमेंट करणे अथवा अकाऊंटची माहिती देण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे मोह करत आहेत. तसेच खोट्या ओटीपीद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने सर्वांनी अलर्ट राहणे महत्वाचे. असे ग्राहकांना याबाबत माहिती Airtel कंपनीचे सीईओ गोपाळ वित्तल यांनी दिलीय.