Delhi Police | दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन सक्सेस; PAK चा मोठा कट उधळला ! स्फोटकांसह 6 दहशतवाद्यांना केली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Delhi Police | दिल्ली पोलिसांंच्या (Delhi Police) स्पेशल सेलने एक मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. दोन पाकिस्तानी नागरिकांसह एकूण 6 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. आता त्यांची विविध प्रकारातून चौकशी सुरु आहे. 6 जणांपैकी त्यामधील दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

अटक केलेल्या 2 पाकिस्तानी नागरिकला पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या ( Delhi Police) स्पेशल सेलनं दिली आहे.
या प्रकरणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये छापे टाकण्यात आले.
यामधून 6 जण सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांचे एक महिन्यापासून हे ऑपरेशन सुरू होते.
स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या.
या 6 जणांनी दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी केली होती.
धक्कादायक म्हणजे, या 6 जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध होता.
तसेच, युपीत आगामी वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी दरम्यान घातपाती कारवाया घडवण्याचा त्यांचा हेतू होता. त्यासाठीची योजना त्यांनी आखली होती.
मात्र, त्यांचा डाव दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणाने उद्धवस्त केला आहे.

 

Web Title : Delhi Police | delhi police bust pakistan organised terror module arrest 6 including 2 terrorists

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | विकास हवाच आहे, मात्र आपल्या परंपरा मोडून नको, काँग्रेस नेत्याने पालिकेला दिला पर्याय

Vijay Wadettiwar | ‘…तर मी राजीनामा देतो’ – मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Amenity Space | भाजप पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पाटलांचे ऍमेनिटी स्पेस विक्रीला समर्थन – राष्ट्रवादी