25.7 किलो सोनं चोरून झाला ‘तो’ फरार, पोलिसांनी त्याच्याकडून एवढं सोनं जप्त केली की व्यापारी झाला ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरून 25.7 किलो सोने चोरीला गेले, व्यपाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर हा चोर घरातीलच एक नोकर असल्याचे उघड झाले. मात्र नोकर सतत आपली जागा बदलत होता अखेर पोलिसांच्या स्पेशल टीमने राजस्थानातून नोकराला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून 600 ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे.

दिल्लीच्या करोल बागमधील एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे सोनी नामक एक युवक इंचार्ज म्हणून 2017 पासून काम करत होता. तो सोन्याच्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात वाहतूक करत असे.

अशा प्रकारे गायब केले सोने
एक दिवस व्यापाऱ्याला संशय आला की करोल बाग येथून पाठवलेले सोने आणि कॅशमध्ये काहीतरी गडबड होत आहे व्यापाऱ्याने हिशोब तपासायला सुरुवात केली तेव्हा गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत तपास सुरु करणार इतक्यात एक घटना घडली, इंचार्ज असलेला सोनी 25.7 किलोचे सोने घेऊन पसार झाला.

अशाप्रकारे पकडले पोलिसांनी आरोपीला
सर्व प्रकार लक्षात येताच व्यापाऱ्याने ताबडतोब पोलिसांना पाचारण केले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दिवस रात्र तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी सोनीचा मोबाइल ट्रॅक केला. तेव्हा समजले की आरोपी रोज नवीन नवीन जागी फिरत आहे आणि आपले लोकेशन बदलत आहे. शेवटी पोलिसांनी त्याला राजस्थानातून अटक केली. आरोपी सोनीच्या पत्नीचा भाऊ देखील यामध्ये सामील होता तसेच सचिन नामक एका युवकाला देखील पोलिसांनी याबाबत अटक केली आहे. सचिन सोन्याला वितळवण्याचे काम करत होता. पोलिसांनी आरोपीकडून 600 ग्राम सोन्याचे काही दागिने जप्त केले आहेत.सोनी जुगार आणि आयपीएल वर सट्टा देखील खेळत असे.

 

visit : policenama.com 

You might also like