मुलीनं विचारलं पोलिस मार का खाताहेत, कर्मचारी ‘ढसा-ढसा’ रडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीस हजारी न्यायालयात झालेला वकील आणि पोलीस संघर्ष अवघ्या देशाने पाहिला आहे. मात्र अजूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरु आहे. मुख्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या प्रकाराबाबत आता जवानांच्या भावना समोर येऊ लागल्या आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना एक पोलीस कर्मचारी ढसा ढसा रडला आणि म्हणाला त्याची मुलगी आज विचारतीय की पोलिसांना आज का मारहाण होत आहे ?

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आमची मागणी सगळ्यांना माहिती आहे आम्हाला न्याय पाहिजे. घरून येताना मला माझ्या मुलीने विचारले की, पोलिसांना मारहाण का होत आहे ? तुम्ही वर्दीमध्ये का चालला आहात ? तुम्हाला सुद्धा मारहाण होऊ शकते ? मग आम्ही काय करणार ? अशा प्रकारच्या भावना पोलिसांनी व्यक्त केल्या आहेत.

पार्किंगच्या कारणावरून शनिवारी दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारामध्ये एक वकील जखमी झाला त्यानंतर वकिलांनी आक्रमक पण दाखवत पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत जीपला आग लावली.

यानंतर दिल्लीमध्ये काही परिसरात वकिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले केले आणि हाणामारी केली. साकेत कोर्ट आणि कडकडडूमा कोर्टाच्या बाहेर देखील वकिलांनी मोठा गोंधळ केला.

काय म्हणणे आहे नेमकं दोन्ही गटांचा
मंगळवारी पोलिसांनी आंदोलन करत त्यांच्या साथीदारांवर केलेल्या केसेस मागे घेण्याची मागणी केली होती. तसेच वकिलांवर कारवाई करण्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली होती. तसेच वकिलांनी देखील हवेत फायरिंग करणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास