Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ मध्ये PAK निर्वासितांच्या मदतीसाठी धावल्या दिल्लीच्या ‘या’ महिला DCP, म्हणाल्या – ‘संकटात हे आमचे कर्तव्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा कहर देशभर सुरु असताना यात गरिबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशा कठीण प्रसंगात कर्तव्य बजावणाऱ्या दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांना मदत केली. पाकिस्तानचे काही निर्वसीत दिल्लीच्या मजलिस पार्क मध्ये कॅम्प बनवून राहत आहेत. दिल्लीच्या डीसीपी विजयंत आर्य आणि त्यांच्या पथकाने या निर्वासितांना जरुरी सामानाचे वाटप केले आहे. येथे जवळपास २८० कुटुंब राहत आहेत. लॉक डाऊन मुळे त्यांना खाण्यापिण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना डीसीपी विजयंत आर्य म्हणाल्या की, आम्हाला इकडे बरेच लोक आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समजताच . आम्ही ठरवले की इथे राहणाऱ्या लोकांना लागणारे खाण्यापिण्याचे सामान आणि औषधे देऊ. त्या म्हणाल्या की कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या सर्वांना एक असणे महत्वाचे आहे. आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा काळात लोकांची मदत करा.

या शिबिरात राहणाऱ्या एका निर्वासिताने म्हंटले की , आम्ही पाकिस्तानच्या सिंध भागातून आलो आहोत. जवळपास २८० कुटुंब आहेत. आम्ही कामासाठी कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आम्हाला ही मदत देऊ केली आहे. तसेच त्याने हे देखील सांगितले की लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांना जेवण देखील पुरवले जाते. त्यामुळे आम्ही दिल्ली पोलिसांचे आभारी आहोत.