‘मिसींग’ मुलीचा शोध घेता-घेता पोलिसांकडून ‘ऑनलाईन’ सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या ईशान्य भागात एका हरवलेल्या मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना एका सेक्स रॅकेटचा शोध लागल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी छापा टाकत हे रॅकेट दिल्ली पोलिसांनी महिला आयोगाच्या साहाय्याने उध्वस्त केले असून घराचा मालक आणि दोन जणांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. तरी अद्याप या रॅकेटमधील २० मुली गायब असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

असे चालत होते ऑनलाईन सेक्स रॅकेट :

पैशाचे आमिष दाखवून या सेक्स रॅकेटमध्ये तरुणी, महिला आणि अल्पवयीन मुलींना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ग्राहकांना व्हिडीओ कॉल लावून अश्लील आणि आक्षेपार्ह हालचाली करून दाखविण्यास सांगितले जात असे. या ठिकाणाहून एका रात्रीत जवळपास २२ ते २५ कॉल केले जात असून यातील अनेक कॉल हे आंतरराष्ट्रीय असत. या ठिकाणाहून पोलिसांनी अनेक सिम कार्ड्स, आधार कार्ड्स, सेक्स टॉय, मेमरी कार्ड्स, पासपोर्ट आणि अंतर्वस्त्र हस्तगत केली आहेत. बळजबरीने रात्री १० ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सोशल मीडियावरून ग्राहकांनी व्हिडीओ कॉल करायला सांगत असत.

असा लागला छडा :

या संदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी अधिकृत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार येथील कृष्णा नगर परिसरातील एक महिलेने तिची मुलगी हरविल्याबाबत तक्रार दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. यानांतर आयोगाने पोलिसांत तक्रार देण्यास सांगून वेगाने तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलीच्या बहिणीने माहिती दिली की, तिची हरवलेली बहीण ही नंद नगरीमध्ये सुरु असलेल्या एका ऑनलाईन सेक्स रॅकेटमध्ये सामील झालेली असू शकते.

याचवेळी तिने देखील काही दिवसांपूर्वी या रॅकेटचा बळी पडली होती. मात्र तिची त्यातून कशीतरी सुटका झाल्याचे सांगितले. जवळपास २० मुलींना जबरदस्तीने येथे राहण्यास असून आक्षेपार्हपने व्हिडीओ कॉल वर बोलण्यास आणि व्हिडिओ बनविण्यास सांगतात अशी माहितीही तिने दिली. मिळालेल्या या माहितीनुसार बुधवारी रात्री ९ वाजता कारवाई करत हे सेक्स रॅकेट चालविले जात असणाऱ्या ठिकाणी आयोगाने पोलिसांना सोबत घेऊन धाड घातली. तेव्हा इमारतीच्या टेरेसवर लपवून ठेवलेल्या एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि ३० वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आणि घरमालकासहित २ जणांना अटक करण्यात आली.

दरम्यान, जिच्या हरवल्याची तक्रार आली होती. ती २० वर्षीय मुलगी मात्र अद्यापही बेपत्ता असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like