Delhi Police Bharti : दिल्ली पोलिसमध्ये 5846 पदांवर भरती, 69100 पर्यंत वेतन, 12 वी पासही करू शकतात अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी महिला आणि पुरुषांसाठी ५८४६ पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी एसएससीमार्फत उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र उमेदवार अंतिम मुदत होण्यापूर्वी या वेबसाइटवर delhipolice.nic.in/ जाऊन या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आज १ ऑगस्टपासून पासून सुरू झाली आहे.

पदांचा तपशील
पुरुषांसाठी पदे – ३९०२
महिलांसाठी पदे – १९४४
एकूण पदे – ५८४६

महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – १ ऑगस्ट २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ७ सप्टेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०२०
चलनावरून अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०२०
संगणक आधारित परीक्षेची तारीख – २७ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० दरम्यान

वयोमर्यादा
सामान्य वर्ग आणि ईडब्ल्यूएस वर्ग उमेदवारांसाठी १८ ते २५ वर्षे
ओबीसी प्रवर्गासाठी १८ ते २७ वर्षे
एससी/ एसटी उमेदवारांसाठी १८ ते ३० वर्षे

अर्ज फी
दिल्ली पोलिसांच्या या रिक्त जागांसाठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागेल. त्याचबरोबर एससी/ एसटी / एक्स-एस आणि महिला उमेदवारांचे अर्ज विनामूल्य आहेत.

वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल ३ अंतर्गत २१,७०० ते ६९,१०० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळाचे १२ वी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ऑनलाइन व शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.