डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या 84 वर्षाच्या आजी, नातीनं केलं ‘असं’ काही

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आजी घरातील डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्याचे नातीने सीसीटीव्हीद्वारे पाहिले. त्यानंतर लगेच तिने पोलिसांना फोन केला, पोलिसांनीही तातडीने पावले उचलली आणि आजींची सुखरूप सुटका केली. राजधानी दिल्लीच्या प्रसाद नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे स्वरोश कोहली या वृद्ध महिलेचा जीव वाचला. काही वर्षांपूर्वी पती आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे स्वरोश कोहली एकट्याच राहतात.

दिल्लीच्या अलकनंदा परिसरातून नॅन्सी नावाच्या महिलेने प्रसाद नगर पोलिसांना फोन केला. तिची 84 वर्षांची आजी करोलबागच्या देव नगरमध्ये राहते असे सांगितले. आजीच्या देखभालीसाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही लावला आहे. तो सीसीटीव्ही नॅन्सी मोबाइलवरुन बघत असते. दुपारच्या वेळेस डबल बेडचा बॉक्स उघडत असताना आजीचा तोल गेला आणि ती बॉक्समध्ये पडली व लॉक झाली असे नॅन्सीने पोलिसांना फोनवर सांगितले.

त्यावर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि काही मिनिटांतच दरवाजा तोडून पोलीस कोहली यांच्या घरी पोहोचून त्यांची सुखरुप सुटका केली. जवळपास 10 मिनिटे या आजी बॉक्समध्ये अडकून होत्या. थोड्याचवेळात नॅन्सी आणि तिचे पतीही घटनास्थळी पोहोचले. एका फोनवर तातडीने पावले उचलणार्‍या पोलिसांचे त्यांनी आभार मानले. अशक्तपणामुळे त्यांना बॉक्सच्या बाहेर येता येत नव्हते अशी माहिती यावेळी त्यांनी पोलिसांनी दिली.