Deep Sidhu Arrested : लाल किल्ल्यावर हिंसाचाराचा मास्टरमाइंड दीप सिद्धू अखेर कसा अटक झाला ? पोलिसांनी सांगितली स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकविल्या प्रकरणी आणि ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचारा प्रकरणी आरोपी दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबी अभिनेता सिद्धू याला पोलीस मंगळवारी सायंकाळी 4. 30 वाजता तिस हजारी कोर्टात हजर करतील. कोर्टात हजर झाल्यानंतर त्याला गुन्हा शाखेकडे सोपविला येणार असल्याचे समजते.

पोलिसांनी सांगितले की, दीप सिद्धूला सकाळी 10.30 च्या सुमारास करनालजवळ अटक करण्यात आली. त्यावेळी तो एकटा उभा कोणााची तरी वाट पाहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीप सिद्धूने चौकशी दरम्यान सांगितले की तो बिहारमधील पूर्णियाला जाण्याचा प्रयत्न करीत आहे. दीपची पत्नी आणि कुटुंब सध्या पूर्णियामध्ये आहेत. दीपला अटक झाल्यावर पोलिसांच्या विशेष कक्षाने बिहार, मुंबई, रांची, हिमाचल आणि पंजाबमध्ये सतत रेड्स चालवले. पोलिसांनी सांगितले की चौकशी दरम्यान 26 जानेवारीनंतर दीप सिद्धू पंजाब, यूपी, हिमाचल आणि हरियाणामध्ये थांबला असल्याचे समजले. तो म्हणाला की तो आपल्या मित्रांच्या मोबाइल फोनवरून व्हिडिओ अपलोड करायचा. पोलिसांनी सीआरपीसीच्या 41 सेक्शनमध्ये अटक केली आहे, जे वॉन्टेड आरोपींसाठी आहे.

दिल्ली पोलिसांच्या पीआरओ चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने 26 जानेवारीला लाल किल्ल्यातील आणि दिल्लीच्या इतर भागातील हिंसाचाराचा मुख्य आरोपी दीप सिद्धू याला अटक केली. त्याचे फोटो सार्वजनिक झाले आहेत. त्याच्या अटकेवर आम्ही एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुढील तपास सुरू आहे.

26 जानेवारी रोजी केंद्रातील तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीच्या समर्थनार्थ शेतकर्‍यांनी ‘ट्रॅक्टर परेड’ काढली आणि या दरम्यान शेतकरी व पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी, अनेक आंदोलकांनी ट्रॅक्टर चालवून लाल किल्ल्याकडे जाताना तेथे ध्वज स्तंभावर धार्मिक ध्वज लावला.

हिंसाचार झाल्यापासून सिद्धू वेगवेगळ्या ठिकाणाहून फेसबुक लाइव्ह करत होता. त्यांने शेतकरी नेत्यांवरही गंभीर आरोप केले. त्याच्या फेसबुक लाइव्हमध्ये तांत्रिक मदत देशाबाहेर राहणारी एक महिला करक होती. दिल्ली पोलिस आपल्या पत्रकार परिषदेतही याचा खुलासा करणार आहेत. फेसबुक लाइव्ह दरम्यान कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे टाळण्यासाठी सिद्धू परदेशात बसलेल्या एका महिलेती मदत घेत असत.

दरम्यान, दीप सिद्धूने काही दिवसांपूर्वीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांना एक खुला इशारा दिला होता. स्वत: ला देशद्रोही म्हणवल्याबद्दल चिडलेल्या सिद्धूने शेतकरी नेत्यांना धमकावले होते, ‘जर त्यांनी तोंड उघडले आणि शेतकरी चळवळीची आतील माहिती उघड केली तर या नेत्यांना पळून जाण्याचा मार्गही सापडणार नव्हता.’ दीप सिद्धू म्हणाला, ‘माझ्या बोलण्याला डायलॉग म्हणून समजू नका, हे लक्षात ठेवा, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी दलील आहे. आपली मानसिकता बदला.