रंगलं ‘आत्महत्या’नाटय, वकिल थेट चढला इमारतीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत पोलिसांच्या सत्याग्रहांच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार आता आणखी चिघळला आहे. आज दिल्लीतील वकिल रस्त्यावर उतरले आहेत तर दिल्लीच्या 5 जिल्हा न्यायालयाने काम बंद केले आहे. वकिल सर्वांना न्यायालयाच्या परिसरात येण्यास मज्जाव करत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रोहिणीच्या न्यायालयात तर एका वकिलाने इमारतीच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. याशिवाय साकेत न्यायालय, पतियाळा हाऊस न्यायालय, कडकड्डूमा न्यायालय, तीस हजारी न्यायालय या न्यायालयाच्या वकीलांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.

रोहिणी न्यायालयाच्या परिसरात गोंधळ पाहायला मिळाला. एक वकिल थेट इमारतीवर चढला, आरोपी पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्यात यावा अशी मागणी करत या वकिलाने आत्महत्त्येचा इशारा दिला. बराचवेळ सुरु असलेल्या या नाट्यामुळे परिसरात तणावात्मक वातावरणं होते. काही वेळाने या वकिलाला इमारतीवरुन उतरवण्यात आले. तर रोहिणी न्यायालयाबाहेर एका वकिलाने स्वत:वर पेट्रोल ओतून आत्महत्तेचा इशारा दिला.

काय आहे प्रकरण –
तीस हजारी न्यायालयात मंगळवारी वकिल आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. वकिल पोलिसांना मारहाण करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर दिल्लीतील संतप्त पोलिसांनी मुख्यालयासमोर एकत्र येत रोष व्यक्त केला. दिल्लीत एकूण 85 हजार पोलीस कर्मचारी आहेत. कामाचा ताण, सार्वजनिक ठिकाणी होणारी मारहाण यामुळे त्यांच्यातील असंतोष उफाळून आला. त्यामुळे दिल्लीत 12 तास तणावपूर्ण परिस्थिती होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील कोलमडली. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी पुन्हा एकदा मेणबत्ती मार्चा काढण्यात आला.

केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या दिल्ली पोलिसांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि राज्यातील वातावरण तापले. शनिवारी वकील आणि पोलीस यांच्यात झालेल्या हिसंक चकमकीनंतर वकिलांविरोधात कारवाई करण्याची मागणी गणवेशधारी पोलिसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सकाळपासून उचलून धरली. सहकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची टर उडवण्यात आली.

Visit : Policenama.com