गर्लफ्रेन्ड समजून ‘त्यानं’ चक्क महिला पोलिसासोबत केलं ‘चॅटिंग’, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी अपराध्यांना पकडण्यासाठी एक नवीन फंडा सुरु केला आहे. आता पोलीस अपराध्यांचा माग न काढता त्यांना स्वतःच्या सापळ्यात अडकवत आहेत आणि त्यासाठी दिल्लीतील महिला कॉन्स्टेबलने एक नामी शक्कल लढवून कार चोराला पकडले आहे. मुंडका परिसरात काही दिवसांपूर्वी सोमवीर नावाच्या आरोपीने एक कॅब चोरी केली होती.

पोलिसांनी आरोपीच्या तपासणीसाठी कॉल रेकॉर्ड काढले तेव्हा तो वारंवार आपल्या गर्लफ्रेंडशी बोलत असल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईल जप्त केला. त्यानंतर त्या फोनवरून एक महिला कॉन्स्टेबल सोमवीर सोबत त्याची गर्लफ्रेंड म्हणून चॅटिंग करू लागली.

कोणत्याही प्रकारचा संशय न येऊ देता महिला त्यासोबत वॉट्सअप वरून बोलत राहिली आणि आपण सोमवीरला भेटण्यासाठी किती बेताब आहोत हे त्याला पटवून देत राहिली. अखेर सोमवीर भेटण्यासाठी तयार झाला ठिकाण, वेळ सर्वकाही ठरलं. पोलिसांनी देखील ठरलेल्या ठिकाणी सध्या वेशात त्यांचे पोलीस उभे केले. जसा सोमवीर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक केली.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी