दिल्ली विधानसभा : ‘आप’ विरोधात भाजपचे 200 MP, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 राज्याचे CM दिल्लीच्या मैदानात

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधासभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे कारण अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष आम आदमी पार्टी यांच्याबाबत जनता यायला काय कौल देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दिल्लीतील प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आहे. भाजपने या निवडणुकीसाठी तब्बल 200 खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्र्यांना पाचारण केले आहे. ही 250 जणांची फौज हरवण्यासाठी येत असल्याची टीका आपने कडून केली जात आहे.

दिल्लीत सत्तेवर असलेल्या आपला केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सोबत सामना करावा लागतोय त्याचप्रमाणे केंद्रात विरोधात असलेल्या काँग्रेसने देखील दिल्ली निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली आहे. त्यामुळे आता मोठी त्रिशंकू लढत दिल्लीत पहायला मिळणार आहे.

दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठी ताकद लावली असली तरी केजरीवाल यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. केजरीवाल यांनी पाच वर्षात केलेल्या कामाच्या आधारावर भाजपवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय सर्वच भाजप नेते दिल्लीच्या प्रचारात तुटून पडलेले आहेत. दिल्लीमध्ये सर्वसामान्य रिक्षा चालक देखील केजरीवालांच्या प्रचारासाठी मदत करत असल्याचे दिसून आले आहे कारण अशाच एका रिक्षा चालकाला पोलिसांनी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

दहा हजारांचा दंड घेतल्यानंतर रिक्षा चालकाने थेट न्यायालयात धाव घेतली आणि याबाबत दाद मागितली. न्यायालयाने पोलिसांना कोणत्या नियमात ही कारवाई करण्यात आली असा सवाल विचारला आहे. अरविंद केजरीवाल यांनी देखील याबाबत ट्विट करून भाष्य केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. इथल्या प्रत्येक नागिरिकाने दिल्ली सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र अमित शहा हे वारंवार दिल्लीकरांचा अपमान करत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा