Delhi Pollution : भारतातील सर्वाधिक प्रदूषित आहे दिल्लीचा ‘हा’ परिसर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2021 मध्ये पहिल्यांदाच एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) राष्ट्रीय राजधानीत 900 च्या स्तरावर गेला आहे. त्यासह दिल्लीचा हा परिसर देशातील सर्वात प्रदूषित क्षेत्र बनले आहे. उत्तर दिल्लीच्या बवाना परिसरात 914 च्या AQI इंडेक्स रिडिंगसह हवेची गुणवत्ता ‘Hazardous’ म्हणून नोंदवण्यात आली. हेच रिडिंग गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात AQI रिडिंग सुमारे 3 टक्क्यांपेक्षा जास्त होते.

बवाना हे परिसर एक औद्योगिक क्षेत्र आहे. या परिसरात मुख्य प्रदूषक पदार्थ (PM) 2.5 असते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन आणि त्यानंतर PM 10 होते त्याचे कारण निर्माण, मलबा आहे. दिल्लीचे द्वारका क्षेत्र 809 नंबरच्या AQI सह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ‘Hazardous’ही म्हटले जाते. गाझियाबादमध्ये AQI बुधवारी तुलनेने चांगला दिसला होता. मात्र, आत्ता 404 च्या ‘Hazardous’ श्रेणीत आहे. डॉक्टरांनी मुले आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांना सल्ला दिला आहे. त्यामुळे जितके जमेल तेवढं घरात राहावे.

बालरोगतज्ज्ञ डॉ. जितेंद्रसिंह यांनी सांगितले, की अशा प्रदूषकांच्या सातत्याने संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. ज्या लोकांना श्वसनाची समस्या आहे. त्यांना प्रदूषकांपासून दूर राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत मुलांवरही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.