PM नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एआयआयएमएस रुग्णालयात जाऊन कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस घेतला. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे.

भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रथम आरोग्य विभागाशी संबंधित डॉक्टर, परिचारिका यांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर्स नंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. त्यावेळी १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळीच एआयएमएस रुग्णालयात गेले व त्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता.

त्यावेळी त्यांनी सर्व ज्येष्ठांना लस घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर मोदी यांनी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी व देशाला कोरोनामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकावे, असे आवाहनही केले.