दिल्ली हिंसाचार प्रकरणी ‘जामिया अलुमनाई असोसिएशन’चा अध्यक्ष शिफा -उर्रहमानला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचाराच्या कटात जामिया एल्युमिनाई असोसिएशनचा अध्यक्ष शिफा उर्रहमान याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने सोमवारी त्याला अटक केली. पोलिसांकडून त्याची चौकशी सरू आहे. दिल्लीच्या हिंसाचाराच्या कटात प्रसिद्ध विद्यापीठ, महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या बऱ्याच जणांना अटक करण्यात येत आहे.

यापूर्वी स्पेशल सेलने जामिया कोऑर्डिनेशन कमिटीच्या मीडिया प्रभारी सफुरा जर्गरला अटक केली आहे. सफुरा ही तीन महिन्यांची गरोदर आहे. याशिवाय हिंसाचाराच्या कटात मीरान हैदरला अटक केली होती. दोघांवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सफूराने गर्भवती असल्याचे सांगून जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, कोरोडीमल कॉलेजची माजी विद्यार्थीनी गुलफिसा फातिमा हिला देखील हिंसाचाराच्या कटात सहभागी झाल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात यएपीए कायद्यांतर्गत गन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयूचा माजी विध्यार्थी उर खालिद याच्यावरही दिल्लीतील हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास देखील स्पेशल सेल करत आहे.

यापूर्वी आम आदमी पाटी (आप)चे माजी नगरसेवक ताहिर हुसेन याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीच्या चांद बाग हिंसाचार प्रकरणात ताहिर हुसेन याला अटक करण्यात आली होती. आपच्या माजी नगरसेवकारवर आयबी (IB) कर्मचारी अंकित शर्माचा खून कल्याचा आरोप आहे. ताहिर हुसेन याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली.

ताहिर हुसेन याच्या घराच्या छतावर दगड, गोफण आणि पेट्रोल बॉम्ब सापडले. तेथून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये काही समाजकंटक घराच्या छतावरून खाली दगड आणि पेट्रोल बॉम्ब टाकत होते. यानंतर पोलिसांनी हे घर सील केले.