Delhi Riots : दिल्लीतील हिंसाचारानंतर आता राखेच्या ढिगार्‍यातून आणि नाल्यातून निघतायत मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील हिंसाचार जरी मंदावला असला तरी अजूनही दंगली सुरु आहेत. त्यात आता जीटीबी रुग्णालयात आज आणखी एक मृत्यू आढळला. त्यामुळे आता या दंगलीतील मृतांचा आकडा 39 पर्यंत वाढला आहे. उत्तर – पूर्व दिल्लीत दंगल थांबल्यानंतर आता भीती अधिक वाढली आहे. हिंसाचारग्रस्त भागात, राखांचे ढीग आणि नाल्यातून मृतदेह बाहेर येत आहेत. इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चा कर्मचारी अंकित शर्मा याचा मृतदेह मिळाल्यानंतर गुरुवारी गोकुळपुरीतील गंगा विहार जंक्शनजवळील नाल्यातून आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. यामुळे मृतांच्या संख्येबाबतही आता भीती तीव्र झाली आहे. मृतदेहांच्या शोधात पोलिस आता उत्तर – पूर्व दिल्लीतील बंद नाल्यात शोध घेत आहेत.

सिग्नेचर ब्रिजवरुन जाताना खजुरी खास, दयालपूर, करावल नगर आणि गोकलपुरी पोलिस स्टेशन परिसरात घरे, दुकाने गाड्या जळालेल्या अवस्थेत आहेत. आतापर्यंत शिव विहारमधील जळत्या दुकानात आणि कारमध्ये एक मृतदेह सापडला आहे. दुकानात काम करणारा दिलबर नेगीचा मृतदेह गुरुवारी सापडला तसेच सोनिया विहारच्या ग्रीन गार्डनमध्ये जळालेल्या गाडीजवळ मृतदेह सापडला. त्यात आता हिंसाचाराने प्रभावित परिरात आता नाल्यांतही शोध मोहीम सुरु आहे, जेणेकरून आणखी मृतदेह आढळण्याची शक्यता आहे. मनपाचे कर्मचारी आणि पोलिस मृतदेहांच्या शोधात कचरा कुंडीत नाल्यात शोध घेत आहेत. पाटबंधारे व पूर विभाग, पूर्व दिल्ली महानगरपालिका आणि पोलिस यांच्यात या संदर्भात बैठकही घेण्यात आली आहे. ईडीएमसी आयुक्त डॉ. दिलराज कौर आणि प्रवक्ते अरुण कुमार यांनी नंतर सांगितले की, मृतदेहांच्या शोधात पोलिस महामंडळ पोलिसांना सर्वतोपरी मदत करेल.

पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागाचे कर्मचारी अनिल त्यागी यांनी सांगितले की, गुरुवारी नाल्याच्या कचऱ्यात मृतदेह तरंगताना आढळला. ते म्हणाले, ‘मृतदेहाची बातमी समजताच येथे गर्दी जमण्यास सुरुवात झाली. परंतु या भागात कर्फ्यू आहे, त्यानंतर तत्काळ सैन्याने तेथे येऊन लोकांना तेथून दूर केले. ते म्हणाले कि, गुरुवारी सकाळी 11 वाजता दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याची ओळख पटली जाऊ शकली नाही. दरम्यान, भागीरथी विहार येथे राहणारे 62 वर्षीय रणजितकुमार यांनी दावा केला की नाल्यातून मिळाला मृयूतदेह परिसरातील रहिवासी नव्हता आणि त्याचा मृतदेह मुस्तफाबादहून वाहत नाल्यामध्ये इथे आला असावा.

‘सर्वत्र शोध घेतला, रुग्णालयात मृतदेह सापडला’
दरम्यान, नाल्यातून काढल्या गेलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली जात आहे. मुशर्रफ असे त्याचे नाव असून त्याचा मृतदेह चांद बागच्या नाल्यातून सापडला. मृताची बहीण फरहीन म्हणाली, “आम्ही सर्वत्र गेलो पण त्याचा कोठेही शोध लागला नाही.” आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की मुशर्रफ (वय 35) यांना नाल्यात फेकण्यात आले आहे. जेव्हा आम्ही त्याला नाल्यात शोधू शकलो नाही, तेव्हा आम्ही गुरुवारी सकाळी जीटीबी रुग्णालयात गेलो असता त्याचा मृतदेह सापडला.

दरम्यान, मोहशीनचा मृतदेह भजनपुरा नाल्यात सापडला होता. मोहशीनचे काका वारिस अली खान म्हणाले, ‘मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते काही कामानिमित्त भजनपुरा येथे आले. जमावाने त्याच्या गाडीला वेढले आणि त्याची पॅन्ट काढण्यास सांगितले. यादरम्यान त्याने मित्राला फोन केला. पण जोपर्यंत कोणी वाचविण्याचा प्रयत्न करते, त्याला ठार करून नाल्यात फेकण्यात आले होते.

You might also like