दिल्ली दंगलीचे मरकज ‘कनेक्शन’, मौलाना ‘साद’शी आरोपींचे लागेबांधे

नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलीबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. दिल्ली दंगलीतील आरोपी आणि मौलाना साद यांच्यात अतिशय जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. तपासात माहिती समोर आली की, दंगलीच्या दरम्यान सुद्धा दोघे सतत संपर्कात होते. मौलाना सादचा अतिशय जवळचा अब्दुल अलीम हा ब्रिजपुरीमध्ये राजधानी स्कूलमध्ये झालेल्या दंगलीचा मुख्य आरोपी फैजल फारुखीच्या संपर्कात होता. अब्दुल अलीम जो जाकिर नगर ओखला पश्चिमचा राहणारा आहे, तो मरकज प्रमुख मौलाना सादचा जवळचा आहे.

मौलाना सादने कोरोना संकटादरम्यान हजरत निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली. तेथे मोठ्या संख्येने भारतीय आणि परदेशी मुस्लिम पोहचले होते. तसेच त्यांनी तबलीगी जमात कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये मौलानासोबत अब्दुल अलीम सुद्धा होता. ज्याने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथे सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन करण्यात आले नाही आणि कोरोना व्हायरस मोठ्याप्रमाणात पसरला, असा आरोप आहे.

क्राइम ब्रांचच्या तपासात उघड झाले की, अब्दुल अलीम सतत दंगलीतील आरोपी फैजल फारूखच्या संपर्कात होता. दिल्लीत हिंसेच्या दरम्यान सुद्धा दोघांची चर्चा झाली. आरोपी फैजलची राजधानी स्कूलमध्ये झालेल्या दंगलीत महत्वाची भूमिका होती. अब्दुल अलीम तबलीगी जमातमध्ये मोठ्या पदावर होता. यासाठी त्याने फैजलला दंगलीच्या वेळी मदत केली. याप्रकरणी पुढील तपास अजून सुरू आहे.