दिल्लीच्या भजनपुरामध्ये ‘कोचिंग’ सेंटरचं ‘छत’च कोसळलं, 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू तर 13 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या भजनपुरामध्ये एका कोचिंग क्लासचे छत कोसळल्याची घटना समोर आली. घटनेत कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थी आणि एका पुरुष शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले. बचाव पथकाकडून बचावाचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

घटनेतील मृतांची नावे –
1. फरहा ( वय – 6 वर्ष)
2. देशु (वय – 14 वर्ष)
3. कृष्णा (वय- 12 वर्ष)
4. उमेश (शिक्षक, वय – 37 वर्ष)

सांगितले जात आहेत की जेव्हा कोचिंग क्लासचे छत कोसळले तेव्हा तेथे विद्यार्थी उपस्थित होते. घटनेत 13 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस, बचाव पथक आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

शक्यता वर्तवली जात आहे की अद्यापही 10 विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये कोसळलेल्या छताच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न बचाव पथकाकडून केला जात आहे. या घटनेने कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीत एक कोचिंग क्लास सुरु होता. छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अजूनही काही विद्यार्थी अडकल्याची शक्यता आहे. अधिकऱ्यांनी सांगितले की संध्याकाळी साडे चारच्या सुमारास आम्हाला ही माहिती मिळाली की भजनपूरा भागात एका कोचिंग क्लासचे छत कोसळले. त्यानंतर घटनास्थळी 7 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी सांगितले की बचाव कार्य अद्याप सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा –