Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था – Delhi Saket Court | दिल्लीतील साकेत न्यायालयाकडून (Delhi Saket Court) एक महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर जावई आणि नातवांचा हक्क असेल, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं आहे. पुढील आदेशापर्यंत मालमत्तेची विक्री किंवा इतर कुठलाही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली. एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे. (Even If Daughter Is Dead, Her Husband And Children Have Right In Her Father’s Property – Delhi Court)

 

साकेत न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश कुमार लाकर (Justice Naresh Kumar Laker) यांच्या न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी दिली आहे. संपत्तीच्या वादातून भाच्याने त्याच्या दोन मामांविरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, आजोबांच्या संपत्तीत मामाने हक्क दिला नसल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. यावर आज सुनावणी पार पडली आहे.

 

न्यायालयाने म्हटलं की, जर मुलीचा मृत्यू झाला, तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल.
या प्रकरणात जोपर्यंत संपत्तीतील हिस्सा निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष तिची विक्री करू शकत नाही. याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार होती. याचिका करणाऱ्याचाही त्या संपत्तीमधील 1 तृतीयांश भागावर हक्क होता. दरम्यान, याप्रकरणी आगामी तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तेचे मूल्यांकन करावे. तसेच, पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवर बंदी घातली आहे. असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Web Title :- Delhi Saket Court | Even If Daughter Is Dead Her Husband And Children Have Right In Her Father’s Property Delhi Saket Court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा