Delhi Sessions Court | ‘सासरचा प्रत्येकजण हुंड्याच्या छळाचा आरोपी होऊ शकत नाही’ – न्यायालयाचा मोठा निर्वाळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi Sessions Court | हुंड्यासाठी छळ आणि फसवणुक करणाऱ्या महिलेच्या सासरची निर्दोष मुक्तता करत दिल्ली सत्र न्यायालयाने (Delhi Sessions Court) एक मोठा निर्वाळा केला आहे. सासरचा प्रत्येक सदस्य हुंड्याच्या छळाचा आरोपी होऊ शकत नाही. तक्रारदाराने आरोप केल्यास, त्यासाठी त्याला संबंधित कुटुंबातील सदस्याचा छळ सिद्ध करणारा पुरावाही द्यावा लागेल. तसेच प्रत्येक लहानसहान वादाला यातना म्हणता येणार नाही. असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

हुंडाबळी प्रतिबंध कायदा (Dowry Prohibition Act) लागू करण्यात आला आहे. जेणेकरून महिलेला तिच्या सासरच्या घरातील छळापासून संरक्षण मिळावे. मात्र मागील काही वर्षांत या कायद्याच्या गैरवापर करण्यात येत आहे. असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव कुमार (Additional Sessions Judge Sanjeev Kumar) यांच्या न्यायालयाने म्हटलं आहे. (Delhi Sessions Court)

 

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, खुद्द देशातील वरिष्ठ न्यायालयांनीही वेळोवेळी आपल्या निर्णयात नमूद केले आहे की, लग्नानंतर फक्त सासरच्याच प्रत्येक सदस्यालाच नाही तर इतर नातेवाईकांनाही किरकोळ वादातून हुंड्यासाठी छळाच्या खोट्या प्रकरणात अडकवले गेले. शेवटी पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली परंतु, मानसिक व शारीरिक छळ (Mental And Physical Abuse) सहन करावा लागला.

 

दरम्यान, तक्रारदाराने छळाची वेळ, पद्धत आणि तारीख नमूद केली आहे.
अशा परिस्थितीत सासू-सुनेवर आरोप केले जातात.
तर सासरच्या मंडळींना नुसतं म्हणणं पुरेसं नाही की, तक्रारदाराने तिच्या पतीबद्दल तक्रार केली होती आणि तिचा मुलगा जे करतोय ते योग्यच आहे, असं तिने म्हटलं होतं.
दरम्यान, न्यायालयाने तक्रारदार महिलेच्या सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि फसवणुक केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत.
तक्रारदार महिलेच्या सासूवर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत फिर्यादी कडे प्रथम दर्शनी पुरावे (First Sight Evidence) असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Delhi Sessions Court | Delhi Sessions Court On Dowry Harassment

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा