आता ‘शाहीन बाग’ परिसरात ‘फायरिंग’, पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपीला (व्हिडीओ)

0
13

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शाहीन बाग परिसरात सीएए विरोधात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान एका तरुणाने गोळीबार केल्याचा प्रकार घडला. गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल म्हणाले की या व्यक्तीने हवेत गोळीबार केला, त्यानंतर त्याला पोलिसांकडून तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वी गुरुवारी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात दिल्लीमध्ये जामिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटी राजघाटपर्यंत मोर्चा (रॅली) काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान फायरिंगचा (गोळीबार) प्रकार घडला होता. जामिया मिलियाच्या आवारात ही गोळीबार झाला होता. ज्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता.

त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते की, त्या व्यक्तीने खुलेआम गोळी चालवली परंतु पोलीस काहीही करु शकले नाहीत. आंदोलनकर्त्यांच्या दिशेने तो अज्ञात व्यक्ती पुढे येत होता. असे असताना ही पोलीस शांत होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की गोळीबार करणारा नारे देत होती की घ्या, आझादी घ्या. त्यानंतर त्याने गोळीबार केला. गोळी विद्यार्थ्यांच्या दिशेने चालवण्यात आली होती.

जामिया परिसरात गोळीबार करणारा तरुण दिल्ली पोलीस जिंदाबाद आणि वंदे मातरम अशी नारेबाजी करत होता. पोलिसांनी काही वेळाने या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून या व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. तर गोळीबारात जखमी झालेल्या तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जामिया गोळीबारानंतर डीसीपी चिन्मय बिस्वाल म्हणाले होते की गोळी देशीकट्यातून चालवण्यात आली. तसेच आरोपींने वादग्रस्त नारेबाजी केली.