शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा हटवली ? पोलिसांचा मोठा ‘खुलासा’

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील महत्वाचे नेते शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा हटवल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्योराप झाले. मात्र, चार दिवसांनंतर पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर पुर्वी असलेली सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, पवार यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा हटविण्यात आलीच नव्हती असा खुलासा दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे.

वाय सुरक्षेअंतर्गत शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान सुरक्षारक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. मात्र, 20 जानेवारीपासून त्या जवानांनी कोणालाही कल्पना न देता पवारांच्या निवासस्थानावर जाणे बंद केले होते. तब्बल चार दिवसानंतर ते जवान परतले आहेत. केंद्रीस राखीव पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांपैकी तेथे नेमणुकीस असलेल्यांकडे कामावर का पोहोचले नाहीत याबाबत चौकशी सुरूदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, चार दिवस पवारांच्या निवासस्थानी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

20 जानेवारी रोजी रात्री निवासस्थानावरील सुरक्षा हटविली आणि त्यानंतर सलग दोन दिवस यावरून चांगलेच राजकारण तापले. त्यानंतर सुरक्षा हटविलीच नाही असं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिले आहे. नियमान्वये पवार यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचे कर्मचारी पुर्वीप्रमाणे तैनात असल्याचं देखील दिल्ली पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like