Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगवॉर ! पोलिसांच्या ताब्यातील गँगस्टरची हत्या, दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी केले ठार (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Delhi Shootout | राजधानी दिल्लीमधील रोहिणी कोर्टात गँगवॉर घडले आहे. शुक्रवारी दुपारी येथे मोस्ट वाँटेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर कोर्ट परिसरात शूटआऊट झाले आणि हल्लेखोरांना सुद्धा पोलिसांनी ठार (Delhi Shootout) केले.
स्पेशल सेलच्या जवानांनी 2 जणांना केले ठार
या शूटआऊटमध्ये (Delhi Shootout) आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी जितेंद्र हा पोलिसांच्या ताब्यातील आरोपी आहे.
जितेंद्रवर हल्ला करणार्या दोन हल्लेखोरांना स्पेशल सेलच्या जवानांनी ठार केले.
#WATCH दिल्ली के रोहिणी कोर्ट में हुई फायरिंग का वीडियो।
दिल्ली पुलिस के मुताबिक हमलावरों ने गैंगस्टर जितेंद्र मान गोगी पर गोलियां चलाईं, जिसकी मौत हो गई है। पुलिस ने तीन हमलावरों को भी मार गिराया है। pic.twitter.com/oJ4omCZeKp
— ANI_HindiNews (@AHindinews) September 24, 2021
एक महिला वकील जखमी
जितेंद्र उर्फ गोगी तिहार जेलमध्ये बंद होता, त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यासाठी आणले होते.
या दरम्यान रोहिणी कोर्टात हल्लेखोरांमध्ये शूटआऊट झाले.
रोहिणी कोर्टात झालेल्या फायरिंगनंतर परिसर सील करण्यात आला.
या चकमकीमध्ये एक महिला वकील सुद्धा जखमी झाली आहे.
वकील बनून आले होते हल्लेखोर
दिल्ली पोलिसांनुसार, दोन हल्लेखोर वकीलाच्या वेशात कोर्टात आले होते ज्यांनी गँगस्टर जितेंद्रवर गोळी झाडली.
स्पेशल सेलची टीम जितेंद्रला कोर्ट रूममध्ये घेऊन गेली होती, जिथे ही घटना घडली.
राहुलवर 50 हजारांचे बक्षीस
दिल्लीच्या टिल्लू गँगने जितेंद्रची हत्या केली आहे. जे दोन हल्लेखोर ठार झाले आहेत.
त्यांच्यापैकी एक राहुल आहे ज्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस आहे.
तसेच आणखी एक हल्लेखोर आहे.
दोन वर्षापूर्वी सापडला होता जितेंद्र
जितेंद्रला दोन वर्षापूर्वी स्पेशल सेलने गुरुग्राममधून अटक केली होती.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनुसार, जितेंद्र गोगी यांनी गुन्हेगारीतून प्रचंड संपत्ती कमावली होती.
जितेंद्र गोगीच्या नेटवर्कमध्ये 50 पेक्षा जास्त लोक आहेत.
जितेंद्रचा साथीदार झाला होता कस्टडीतून फारार
जितेंद्र गोगीला 2020 मध्ये गुरुग्राममधून अटक करण्यात आली होती. गोगीसह कुलदीप फज्जाला सुद्धा पकडले होते.
कुलदीप फज्जा 25 मार्चला कस्टडीतून फरार झाला होता.
फज्जा जीटीबी हॉस्पिटलमधून फरार झाला होता ज्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाला.
Web Title : Delhi Shootout | police and intelligence story delhi rohini court firing most wanted gangster jitendra police investigation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update