पैलवान सुशीलकुमारची दुकानदाराला मारहाण, स्टेडिअममध्ये साहित्य पुरवल्याचे पैसे मागतिल्याने मारहाण झाल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पैलवान सागर राणा हत्येप्रकरणी ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता सुशील कुमाराला(Sushil Kumar) दिल्ली पोलीसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यानंतर आता पैलवान सुशील कुमारवर(Sushil Kumar) छत्रसाल स्टेडियममध्ये खाद्य साहित्य पुरवणा-या आणखी एका किराणा दुकानदाराने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये 4 लाखांचे सामान पाठविलो होते. त्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमारने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे.

CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा होणार की नाही ?, विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित

सतीश गोयल असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. गोयल म्हणाले की, सत्पाल हे प्रशिक्षक असल्यापासून मी या स्टेडिअममध्ये सामान पोहचवत होतो. 2020 मध्ये विरेंद्र नावाच्या प्रशिक्षकांनी साहित्य मागवले. त्यानंतर त्यांची बदली झाली. नंतर अशोक हे प्रशिक्षक झाले. माझी 4 लाख रुपयांची बाकी होती. मी पैसे मागितले त्यावेळी त्यांनी मला बोलावून घेतले आणि बिल घेतले. दुसऱ्या दिवशी सुशिल कुमारने बोलावुन घेतले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मला पैसे मिळाले नाही तर मी मरुन जाईन, यावेळी सुशिल कुमारसह इतर मल्लांनीही मारहाण केली. त्यानंतर मी खुप दिवस घराबाहेरच पडलो नाही. मला या लोकांची भिती वाटत होती, हे सर्वजण मला पुन्हा मारहाण करतील असे ते म्हणाले.

 

WhatsApp वर 3 लाल टिक खरंच येणार का? Viral मेसेजमधील काय आहे सत्य? जाणून घ्या

Indian Idol 12 : इंडियन आयडॉलमध्ये आणखी एक ‘प्रेमकथा’? सायली कांबळे म्हणाली – ‘माझं त्याच्यावर प्रेम’

Coronavirus : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं तरूण सरपंच ऋतुराज देशमुखांचं कौतुक, ऋतुराजनं केलं कोरोनामुक्त गाव

Flipkart वर ‘या’ 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन घरबसल्या जिंका ‘भरघोस’ बक्षिसे आणि मिळवा ‘डिस्काऊंट’ व्हाऊचर, जाणून घ्या प्रोसेस