‘पॉप स्टार’ रिहाना म्हणाली – ‘शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही ?’ संतापलेली कंगना म्हणाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या टीकेची धनी बनताना दिसत आहे. तिनं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर टीका केली जात आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणात लक्ष घातल्यानं भारताचा माजी स्टार क्रिकेटर प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) नं तिला फटकारलं आहे. आता बॉलिवूड ॲक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनंही तिच्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाली कंगना ?
रिहानानं केलेल्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं लिहिलं की, यासंदर्भात यामुळं चर्चा होत नाहीये, कारण हा शेतकरी नाही, तर दहशतवादी आहे. यांची भारत तोडण्याची इच्छा आहे, म्हणजेच चीनसारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करती आण युएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मुर्ख. आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाहीत की, आपल्या देशाला विकू.

काय म्हणाली होती रिहाना ?
रिहानानं ट्विटरवर एक न्यूज शेअर करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. यात शेतकरी आंदोलनामुळं बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात हरियाणातील अनेक जिल्ह्यात यामुळं इंटरनेट सेवा कशा प्रकारे बंद करण्यात आली हेही सांगितलं आहे. या न्यूजसोबत तिंन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपण यासंदर्भात चर्चा का नाही करत आहोत.