PM मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावली, महत्वाची कागदपत्रे चोरीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स चोरट्याने हिसकावून नेली. ही घटना दिल्लीतील सिव्हिल लाइन्स या उच्चभ्रू वस्तीत घडली. या पर्समध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे दिल्लीतील महिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन मोदी आज (शनिवारी) कुटुंबियांसह दिल्लीतील गुजरात समाज भवनच्या गेटवर रिक्षातून उतरत होत्या. रिक्षातून उतरत असताना पाठीमागून दोन जण स्कूटीवर आले व त्यांनी त्यांच्या हाताला हिसका मारून त्यांची पर्स हिसकावून नेली. या पर्समध्ये 56 हजार रुपयांची रोख रक्कम होती. दोन मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांना आज सायंकाळी अहमदाबादल फ्लाइटने जायचे होते. परंतु, कागदपत्रे चोरीला गेली आहेत.

याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञांत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com