Delhi suicide | सर्वोच्च न्यायालयासमोर महिलेसह पुरुषानं घेतलं स्वतःला पेटवून; अन्…

दिल्ली : वृत्तसंस्था Delhi suicide । आज सुप्रीम कोर्टाबाहेर (Supreme Court) एक महिला आणि पुरुषाने आत्महत्येचा (Delhi Suicide) प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेसह पुरुषानं स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) गेटसमोर क्रमांक डी (Gate number D) ठिकाणी त्या महिला आणि पुरुषाने स्वतःला पेटून घेतलं आहे. या दरम्यान, गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी (Security personnel) लगेच धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. महिला आणि पुरुष या दोघा जखमींना तातडीनं राम मनोहर लोहिया रुग्णालयात (Ram Manohar at Lohia Hospital) उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि पुरुष या दोघांना गेट नंबर डी (Gate number D)
मधून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जायचं होतं.
मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्यामुळं सुरक्षा रक्षकांनी त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये प्रवेश दिला नाही. म्हणून त्या दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटसमोरच स्वतःला पेटवून घेतलं आहे.
दोघांनी पेटवून घेताच परिसरात एकच खळबळ उडाली. आणि गोंधळ निर्माण झाला.
गेटवरील उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धावपल करत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर दोघां जखमींना तातडीनं पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

या दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार जेव्हा एक पुरुष आणि महिला न्यायालयाच्या गेट क्रमांक डी वर आले. तेव्हा त्यांच्या हातात एक बाटली होती.
त्या बाटलीत काही ज्वलनशील पदार्थ असल्याचा संशय आहे.
मात्र, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत अजूनही कोणती माहिती पुढं आली नाही.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Delhi Suicide | attempt to suicide in front of supreme court gate a man and woman set themself on fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, सुधारित शासन निर्णय जारी

Pune Crime | जादा व्याजदराच्या आमिषाने 56 गुंतवणूकदारांची 46 कोटी फसवणूक, पंकज छल्लाणीचा जामीन फेटाळला

Afghanistan Crisis | तालिबानी शासकांच्या भितीने अफगाणी नागरिक देश सोडण्यासाठी अस्वस्थ, पहा हृदयात धडकी भरवणारा व्हिडीओ