युवकाची हत्या, प्रथम मुलीने झाडली गोळी, त्यानंतर तरूणांनी केला गोळीबार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीच्या रोहिणी भागात एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी बेगमपूरची आहे. येथे योविन उर्फ ​​भारत सोलंकी नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली. मृत योविनवर खंडणी आणि दरोडा यासारखे काही गुन्हे दाखल झाले आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही होती.

योविन कुच कला सुलतानपुरी भागात राहत होता. योविनच्या वडिलांची प्रॉपर्टीचे काम होते. शुक्रवारी संध्याकाळी योविन आपल्या एका मैत्रीणीला भेटायला आला तेव्हा किराणा स्टोअर समोरून पांढऱ्या कारमध्ये असलेल्या मुलांशी त्याच्या वाद झाला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाने त्याला गोळी घातली. त्याची मैत्रिण बचावासाठी आली, परंतु तोपर्यंत कारमधील बदमाश पळून गेले. आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिस प्रत्येक अँगलमधून प्रकरणाता तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचे एक फुटेज समोर आले आहे. मारेकऱ्यांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे, जिने आधी कारच्या बाहेर उभे असलेल्या मुलावर गोळीबार केला आणि त्यानंतर मुलीसमवेत असणााऱ्य बदमाशांनी तरुणाला गोळ्या घालून ठार केले.