धक्कादायक ! दिल्लीतील IIT कॅम्पसमध्ये लॅब टेक्निशीअनची पत्नी, आईसह आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील आयआयटी कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्पसमध्ये राहणाऱ्या लॅब टेक्निशियनने आपल्या पत्नी आणि आईसह आत्महत्या केली आहे. काल रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोलिसांना फोन आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना घटनास्थळी तिघांचेही मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आले. त्यांनी पंख्याला फाशी घेऊन आपले जीवन संपवले.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गुलशन असून त्याच्या पत्नीचे नाव सुनीता होते. पोलिसांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आली नसून मृतदेह सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ऊत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहेत. पोस्टमोर्टम केल्यानंतर तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार आहे. घटनेविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले कि, मृत गुलशन याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो मूळचा हरियाणाचा राहणारा असून त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

दरम्यान, सध्या पोलीस त्याच्या मित्र आणि नातेवाईकांकडे तपासणी आणि चौकशी करत असून त्यानंतरच त्यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –