दिल्‍लीत पुन्हा ‘सम-विषम’ फॉर्म्युला, मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी दिल्लीमध्ये ऑड-ईवन योजना पुन्हा सुरु केली असून 12 दिवस हे चालणार आहे. 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हि योजना चालणार असून यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये ६ दिवस ईवन नंबर वाल्या गाड्या चालणार असून 6 दिवस ऑड नंबर असलेल्या गाड्या चालणार आहेत.

फटाखे न उडवण्याचा सल्ला
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासाठी दिल्लीकरांना आणखी एक आवाहन केले आहे. दिल्लीत दिवाळीच्या वेळी देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे यावेळी दिल्लीकरांनी फटाखे न फोडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात दिल्लीकरांना सरकारकडून मास्क देखील वाटण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –